TEXT 55
bhaktyā mām abhijānāti
yāvān yaś cāsmi tattvataḥ
tato māṁ tattvato jñātvā
viśate tad-anantaram
भक्त्या-विशुद्ध भक्तीने; माम्-मला; अभिजानाति-मनुष्य जाणू शकतो; यावान्-जितका; यः च अस्मि—जसा मी आहे; तत्त्वतः-तत्त्वतः; ततः—त्यानंतर; माम्-मला; तत्त्वतः-तत्त्वतः; ज्ञात्वा-जाणून; विशते-तो प्रवेश करतो; तत्-अनन्तरम्-त्यानंतर,
मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवदधामात प्रवेश करू शकतो.
तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचास्वीकार केला पाहिजे. अन्यथा भगवत् -तत्त्व नेहमी गुप्तच राहते. भगवद्गीतेमध्ये (२५) सांगितल्याप्रमाणे, नाहं प्रकाश: सर्वस्य - भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाहीत. केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही. जो मनुष्य कृष्णभावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो तोच श्रीकृष्णांना तत्त्वत: जाणू शकतो. या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत.
जो मनुष्य कृष्ण-तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर, भक्त आणि भक्तीनय सेवा हे तिन्हाही असतात. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो व तेच व्यक्तिगत अस्तिष्ठव असते, परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्णभावनामय असते. विशते अर्थात, 'माझ्यामध्ये प्रवेश करतो. या शब्दाचा कोणीही असा गैरअर्थ काढू नये की, जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो' या अद्वैतवादाच्या जीव आपल्या स्वरुपस्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा सिद्धांताचे हा शब्द समर्थन करतो. तसा अर्थ अजिबात नसून विशते म्हणजे करण्याकरिता भगवद्धामात प्रवेश करूशकतो. उदाहरणार्थ, एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरिता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरिता बसतो. निर्विशेषवादी हे सामान्यपणे सागरात वाहत येणा-या व सागरातच विलीन होणा-या नदीचे उदाहरण देतात. निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही तर सागरामध्ये खोलवर राहणा-या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्वतः जाणू शकतो. अकराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की, मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो.
देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत्कथांचे श्रवण केल्याने होतो. जेव्हा मनुष्य भगवत्लीला श्रवण करतो, तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रियतृप्ती साठी असणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात. भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत्सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मषांतून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो. श्रीमद्भागवतातही हेच सांगण्यात आले आहे. मुक्तीनंतरही भक्तियोगरूपी दिव्य सेवा चालूच राहते. वेदान्त सूत्र (४.१.१२) याला पुष्टी देतात की, आप्रायणातू तत्रपि हि दृष्टम्-अर्थात, मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते. श्रीमद्भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की, जीवाने स्वरूपस्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूपस्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की, सर्व जीव भगवंताचे अंश आहेत. म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूपस्थिती हे होय. मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय.