TEXT 19
jñānaṁ karma ca kartā ca
tridhaiva guṇa-bhedataḥ
procyate guṇa-saṅkhyāne
yathāvac chṛṇu tāny api
ज्ञानम्-ज्ञानः कर्म-कर्म: च-आणि; कर्ता-कर्ता; च-आणि; त्रिधा-तीन प्रकारची; एवं खचित; गुण-भेदतः-प्रकृतीच्या विभिन्न गुणांनुसार; प्रोच्यते-म्हटले आहे; गुण-सङ्ख्याने-विभिन्न गुणांच्या रूपांना; यथा-वत्-जसे आहेत तसे; भूणु-ऐक; तानि-ते सर्व प्रकार; अपि-सुद्धा.
प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे तीन प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून ऐक.
तात्पर्यः चौदाव्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे तीन प्रकार सविस्तर वर्णिलेले आहेत. त्या अध्यायात असे म्हटले आहे की, सत्वगुण प्रकाशक आहे, रजोगुण भौतिकवादी आहे आणि तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणारा आहे. प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत. ते गुण मुक्तिदायक नाहीत. सत्त्वगुणातही जीव बद्धच असतो. सतराव्या अध्यायात प्रकृतीच्या निरनिराळ्या गुणांतील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या निरनिराळ्या उपासनांची वर्णन आहे. या श्लोकात भगवान सांगत आहेत की, प्रकृतीच्या तीन गुणांनुसार ज्ञान, कर्ता आणि कर्म यांचे तीन निरनिराळे प्रकार ते सांगू इच्छितात.