No edit permissions for मराठी

TEXT 18

jñānaṁ jñeyaṁ parijñātā
tri-vidhā karma-codanā
karaṇaṁ karma karteti
tri-vidhaḥ karma-saṅgrahaḥ

ज्ञानम्-ज्ञान; ज्ञेयम्-ज्ञानाचे लक्ष्य; परिज्ञाता-जाणणारा; त्रि-विधा-तीन प्रकारचा; कर्म-कर्माला, चोदना-प्रेरक असतो; करणम्-इंद्रिये; कर्म-कर्म, कर्ता-कर्ता, इति-अशा प्रकारे, त्रि-विध:-तीन प्रकारचे; कर्म-कर्म; सङ्ग्रहः -संचय.

ज्ञान, ज्ञेय आाणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा कारणे होत, इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्मांचे घटक आहेत.

तात्पर्य: दैनंदिन कर्म करण्याकरिता तीन प्रेरक असतात-ज्ञान, ज्ञेय (जाणण्याचा विषय) आणि ज्ञाता (जाणणारा). कर्म करण्याची साधने, स्वत: कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काही तरी प्रेरणा होत असते. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचेच सूक्ष्म रूप असते. त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते. प्रथम मनुष्य विचार करणे, अनुभव करणे व इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातो व तिलाच प्रेरणा असे म्हणतात. ही प्रेरणा शास्त्रांतून आली असली किंवा गुरुमहाराजांच्या आदेशातून आली असली तरी दोन्हींनाही समान समजण्यात येते. ज्या वेळी प्रेरणा होते व कर्ताही असतो त्या वेळी इंद्रियांच्या मदतीने, ज्यांच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचाही समावेश होतो, प्रत्यक्ष कर्म घडते. कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्म-संग्रह म्हणतात.

« Previous Next »