No edit permissions for मराठी

TEXT 18

naiva tasya kṛtenārtho
nākṛteneha kaścana
na cāsya sarva-bhūteṣu
kaścid artha-vyapāśrayaḥ

-कधीच नाही; एव-निश्चितच; तस्य-त्याचे; कृतेन-कर्तव्य केल्याने; अर्थ:-हेतू; न-नाही; अकृतेन- कर्तव्य न केल्याने; इह-या जगामध्ये; कश्चन-कोणताही; -नाही; -आणि; अस्य-त्याचा; सर्व-भूतेषु-सर्व जीवांच्या ठिकाणी; कश्चित्-काहीही; अर्थ-हेतू; व्यपाश्रय:- आश्रय घेण्याने.

आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते, त्याचबरोबर इतर प्राणिमात्रांवर अवलंबून राहण्याचीही त्याला काही आवश्यकता नसते.

तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्णभावनाभावित कर्मशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याचे बंधन असू शकत नाही. पुढील  श्लोकामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्णभावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्णभावनाभावित मनुष्य, मनुष्य अथवा देवता, कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्णभावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्यपालन करण्यासाठी पुरेसे असते.

« Previous Next »