No edit permissions for मराठी

TEXT 18

vidyā-vinaya-sampanne
brāhmaṇe gavi hastini
śuni caiva śva-pāke ca
paṇḍitāḥ sama-darśinaḥ

विद्या-विद्या; विनय-आणि नम्रता; सम्पन्ने-युक्त किंवा संपन्न; ब्राह्मणे-ब्राह्मणामध्ये; गवि-गाईमध्ये; हस्तिनि- हत्तीमध्ये; शुनि-कुत्र्यामध्ये; -आणि; एव-निश्‍चितच; श्व-पाके-चांडाळमध्ये (कुत्रा भक्षण करणारे); च-अनुक्रमे; पण्डिता:- जे पंडित किंवा ज्ञानी आहेत; सम-दर्शिन:- जो समदृष्टीने पाहतो

विनम्र साधुव्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे, विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य, जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा, गाय आणि हत्ती हे भिन्न असतील; परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत. कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत, परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परम सत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणिमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मारुपाने प्रत्येक प्राणिमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे. परंतु आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मकदृष्ट्या ते समान असू शकत नाहीत कारण, आत्मा हा विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्णभावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की, आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो.

« Previous Next »