TEXTS 37-38
yady apy ete na paśyanti
lobhopahata-cetasaḥ
kula-kṣaya-kṛtaṁ doṣaṁ
mitra-drohe ca pātakam
kathaṁ na jñeyam asmābhiḥ
pāpād asmān nivartitum
kula-kṣaya-kṛtaṁ doṣaṁ
prapaśyadbhir janārdana
यदि-जर; अपि-सुद्धा; एते- हे लोक; न-नाही; पश्यन्ति-पाहतात; लोभ-लोभाने; उपहत-व्याप्त झालेले; चेतस:- त्यांचे हृदय; कुल-क्षय-कुलानाशाने; कृतम्-होणारा; दोषम्-दोष; मित्र-द्रोहे-मित्रांशी भांडण करून; च-सुद्धा; पातकम्-पापकर्म; कथम्-का; न-नाही; ज्ञेयम्-जाणणे; अस्माभि:- आम्ही; पापात्-पापांपासून; अस्मात्-या; निवर्तितुम्-थांबविण्यासाठी; कुल-क्षय-कुळाचा नाश; कृतम्-झाल्याने; दोषम्-अपराध, गुन्हा; प्रपश्यद्धि:- पाहू शकणारे; जनार्दन-हे कृष्ण.
हे जनार्दन! जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याला मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे?
तात्पर्य: एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत - क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भत अर्जुनाने विचार केला की, अशा आव्हानाच्या परिणामबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा. परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारूच शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो, तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते. पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले.