No edit permissions for मराठी

TEXT 41

saṅkaro narakāyaiva
kula-ghnānāṁ kulasya ca
patanti pitaro hy eṣāṁ
lupta-piṇḍodaka-kriyāḥ

सङ्कर:- अशी अनावश्यक संतती; नरकाय-नरकजीवनास कारणीभूत ठरतात; एव-निश्चित; कुलध्यानाम्-कुळाचा घात करणार्‍यांना; कुलस्य-कुळासाठी; -सुद्धा; पतन्ति-पतन पावतात; पितर:- पितृगण; हि-खचित; एषाम्-त्यांचे; लुप्त-लोप झाल्यामुळे; पिण्ड-पिंड किंवा अन्न अर्पण करणे; उदक-आणि पाणी; क्रिया:- क्रिया.

अनावश्यक संततीच्या वाढीमुळे, कूळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलअर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते.

तात्पर्य: सकाम कर्मामुळे विधिविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठरावीक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते. कारण श्रीविष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधीकधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दु:ख भोगत असतील आणि कधीकधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत व यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरुपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात तेव्हा पूर्वजांची दु:खमय अशा भूतपिशाच्च योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंशपरंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणार्‍यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्याश्यक असते. जो भक्तिमार्गांशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो. श्रीमद्भागवतात (11.5.41) सांगण्यात आले आहे की:

देवर्षि भूताप्तनृणां पितृणां न किंकरो नायमृणी च राजन् ।
सर्वात्मना य: शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ॥

     ‘‘ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंद यांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रमाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे त्याची देवदेवता, ऋषिमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्यासंबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋणे फेडण्याचे बंधने राहात नाहीत.’’ पुरुषोत्तम श्रीभगवान यांची प्रेममयी सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्यांची आपोआपच पूर्तता होते.

« Previous Next »