No edit permissions for मराठी

TEXT 43

utsanna-kula-dharmāṇāṁ
manuṣyāṇāṁ janārdana
narake niyataṁ vāso
bhavatīty anuśuśruma

उत्सन्न-विनाश झालेल्या; कुल-धर्माणाम्-ज्यांना कुलपरंपरा आहेत ते; मनुष्याणाम्-अशा मनुष्यांचे; जनार्दन-हे कुष्ण; नरके - नरकात; नियमत्-नित्य, नेहमी; वास:- निवास; भवित-असे होते; इति-या प्रकारे; अनुशुश्रुम-गुरुशिष्यपरंपरेद्वारे मी ऐकले आहे.

हे प्रजापालक! हे कृष्णा! गुरुशिष्यपरंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की, कुलपरंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात.

तात्पर्य: अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तींच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रमसंस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दु:खमय, कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते.

« Previous Next »