TEXT 1
arjuna uvāca
mad-anugrahāya paramaṁ
guhyam adhyātma-saṁjñitam
yat tvayoktaṁ vacas tena
moho ’yaṁ vigato mama
अर्जुनः उवाच—अर्जुन म्हणाला; मत्-अनुग्रहाय—माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता; परमम्— परम; गुह्यम्-गुह्य; अध्यात्म-आध्यात्मिकः संज्ञितम्-विषयकः; यत्-जे; त्वया-तुम्ही; उक्तम्—सांगितले आहे; वचः-वचन; तेन-त्यामुळे; मोहः-मोह; अयम्-हा; विगत:-नष्ट झाला; मम-माझा.
अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे.
तात्पर्य: श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदिकारण आहेत, हे या अध्यायात दर्शविले आहे. ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडांचा उद्गम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहेत. श्रीकृष्ण हे एक अवतार नसून सर्व अवतारांचे उगम-स्थान आहेत. या गोष्टीचे संपूर्ण विवेचन यापूर्वीच्या अध्यायात केले आहे.
आता अर्जुनाविषयी सांगावयाचे तर, तो म्हणतो की, माझा मोह नष्ट झाला आहे. याचा अर्थ असा आहे की, अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आदिकारण समजतो. अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे; परंतु तो विचार करीत आहे की, जर आपण श्रीकृष्णांचा आदिकारण म्हणून स्वीकार कला, तर इतरही प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो, परंतु श्रीकृष्ण हे इतके दयाळू आहेत की, आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात. श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो, म्हणून आपल्याबाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो. त्याला आता पकी खात्री पटली आहे की, श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मारूपाने स्थित आहेत.