No edit permissions for मराठी

TEXT 30

lelihyase grasamānaḥ samantāl
lokān samagrān vadanair jvaladbhiḥ
tejobhir āpūrya jagat samagraṁ
bhāsas tavogrāḥ pratapanti viṣṇo

लेलिह्यसे-तुम्ही चाटत आहात; ग्रसमानः-ग्रासणारा; समन्तात्-सर्व बाजूंनी; लोकान-लोकांना; समग्रान्—सर्व, वदनैः-मुखांनी; ज्वलद्रि:-जळणा-या; तेजोभिः-तेजाने; आपूर्य-व्यापून; जगत्-जगत; समग्रम्-समग्र; भासः--किरण; तव-तुमचे; उग्राः-उग्र; प्रतपन्ति-तळपत आहे किंवा होरपळणारे; विष्णो-हे विष्णू.

हे विष्णू! तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी, सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहात आहे. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून, उग्र प्रखर होरपळणा-या किरणांनी प्रकट झाला आहात.

« Previous Next »