No edit permissions for मराठी

TEXT 23

upadraṣṭānumantā ca
bhartā bhoktā maheśvaraḥ
paramātmeti cāpy ukto
dehe ’smin puruṣaḥ paraḥ

उपद्रष्टा-देखरेख करणारा किंवा साक्षी; अनुमन्ता-अनुमती देणारा; -सुद्धा; भर्ता-स्वामी; भोक्ता—सर्वश्रेष्ठ भोक्ता; महा-ईश्वरः-परमेश्वर, परम-आत्मा—परमात्मा; इति—सुद्धा; — आणि; अपि-खरोखर; उत:-म्हटले जाते; देहे-देहामध्ये; अस्मिन्-या; पुरुषः-पुरुष, भोक्ता; परः -दिव्य.

तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो.

तात्पर्य: या ठिकाणी म्हटले आहे की, जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे. परमात्मा हा काही सामान्य जीव नव्हे. अद्वैतवादी, देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असल्याचे मानतात म्हणून त्यांना वाटते की, आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत म्हणतात की, प्रत्येक देहामध्ये ते परमात्मारूपाने स्वतःचे प्रतिनिधित्व करतात. तो आत्म्याहून भिन्न आहे; तो पर अर्थात, दिव्य आहे. जीवात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो; परंतु परमात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोक्ता नसतो तसेच तो शारीरिक क्रियांचा कर्ता नसतो, तर तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा आणि सर्वश्रेष्ठ भोक्ता असतो, त्याला आत्मा हे नाव नसून परमात्मा असे नाव आहे आणि तो पाय अलौकीक आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता स्पष्ट आहे. परमात्म्याचे हात आणि  सर्वत्र पसरलेले असतात परंतु जीवात्म्याच्या बाबतीत तसे नसते. परमात्मा हाच परमेश्वर असल्यामुळे तो जीवाच्या भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी, त्याच्या अंतरात उपस्थित असतो. परमात्म्याच्या अनुमतीविना जीव काहीही करू शकत नाही. जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे तर भगवंत भोक्ता किंवा पालनकर्ता आहेत. असंख्य जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून वास करतो.

          सत्य हे आहे की, प्रत्येक जीव हा भगवंतांचा नित्य अंश आहे आणि दोघांमध्येही निकष्टस्थ मित्र म्हणून परस्परसंबंध आहे; परंतु भगवंतांची अनुमती नाकारणे आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवाची प्रवृत्ती असते आणि त्या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले आहे. जीवाला आध्यत्मिक शक्तीत किंवा भौतिक परमात्मा रूपाने त्याचा मित्र म्हणून जीवाबरोबर वास करतात, जेणेकरून जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे. जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीत परत नेण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात. परंतु जीवाला आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारीत असतो. या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बध्दावस्थेतील भौतिक संघर्षाचे कारण असते. म्हणून भगवंत सदैव त्याला अंतर्बाहय आदेश करीत असतात. भगवद्गीतेद्वारे ते बाहेरून उपदेश देतात आणि अंतरातून ते जीवाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात की, भौतिक प्रकृतीमध्ये त्याने केलेले कर्म हे त्याच्या वास्तविक सुखासाठी साहाय्यकारक ठरू शकत नाही. ते म्हणतात की, याचा त्याग कर आणि तुझी श्रद्धा माझ्यावर दृढ कर. तरच तू सुखी होशील. म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंतांच्या ठायी दृढ करतो तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू लागतो.

« Previous Next »