No edit permissions for मराठी

TEXT 24

ya evaṁ vetti puruṣaṁ
prakṛtiṁ ca guṇaiḥ saha
sarvathā vartamāno ’pi
na sa bhūyo ’bhijāyate

यः-जो; एवम्-याप्रमाणे, वेत्ति-जाणतो, पुरुषम्-जीव; प्रकृतिम्-भौतिक प्रकृती; -आणि; गुणैः -त्रिगुण; सह-सहित; सर्वथा-सर्व प्रकारे; वर्तमानः-स्थित होऊन; अपि-तरी; -कधीही नाही; सः-तो; भूय:-पुन्हा; अभिजायते-जन्मास येतो.

जो, भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यासंबंधीचे तत्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही,

तात्पर्य: भौतिक प्रकृती, परमात्मा, जीवात्मा आणि त्यांचा परस्परसंबंध याविषयींच्या स्पष्ट ज्ञानामुळे मोक्षप्राप्ती आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रवेश करण्यास मनुष्य पात्र होतो. आध्यात्मिक जगतात प्रवेश केल्याने त्याला पुन्हा भौतिक प्रकृतीत परतावे लागत नाही. हा ज्ञानाचा परिणाम होय. जीव या भौतिक प्रकृतीमध्ये योगायोगाने पतित झाल्याचे निश्चितपणे जाणणे हाच ज्ञानाचा उद्देश आहे. जीवाने प्रमाणित व्यक्ती, साधुपुरुष आणि आध्यात्मिक गुरू यांच्या सत्संगामध्ये स्वतः प्रयत्न करून आपले स्वरूप जाणून घेतले पाहिजे. तसेच त्याने भगवंतांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करून आपल्या आध्यात्मिक चेतनेचे किंवा कृष्णभावनेचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. नंतर तो पुन्हा या भौतिक जगतात कधीही परतून येणार नाही हे सुनिश्चित होईल आणि आध्यात्मिक जगतात त्याला सच्चिदानंदमय जीवनाची प्राप्ती होईल.

« Previous Next »