No edit permissions for मराठी

TEXT 16

karmaṇaḥ sukṛtasyāhuḥ
sāttvikaṁ nirmalaṁ phalam
rajasas tu phalaṁ duḥkham
ajñānaṁ tamasaḥ phalam

कर्मणः-कर्माचे; सु-कृतस्य-पुण्य; आहुः-म्हटले आहे; सात्विकम्-सत्त्वगुणामध्ये; निर्मलम्-निर्मळ किंवा शुद्ध; फलम्-फळ; रजस:-रजोगुणाचे; तु-परंतु; फलम्-फळ; दुःखम्-दुःख; अज्ञानम्-मूर्खपणा; तमसः-तमोगुणाचे; फलम्-फळ,

पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्त्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते; परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे.

तात्पर्यः सत्वगुणामधील पुण्यकर्माचे फळ हे शुद्ध असते. म्हणून मोहातून मुक्त असलेले ऋषी सुखी असतात. परंतु रजोगुणयुक्त कर्म हे केवळ दुःखकारकच असते. भौतिक सुखाकरिता केलेले कोणतेही कर्म हे निष्फळच ठरते. उदाहरणार्थ, जर मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधावयाची असेल तर ती बांधून होण्यापूर्वी अतिशय कष्ट सोसावे लागतात. संपत्तीचा पुरवठा करणा-याला धनप्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात तसेच बांधकाम करणा-या कामगारांना देखील भरपूर शारीरिक कष्ट करावे लागतात. याप्रमाणे दु:ख हे असतेच. म्हणून भगवद्गीता सांगते की, रजोगुणाच्या प्रभावाखाली केलेले कोणतेही कर्म हे निश्चितच दुःखकारक ठरते. यामध्ये तथाकथित थोडेफार मानसिक सुख असू शकते की, 'हे माझे घर आहे किंवा हा माझा पैसा आहे.' परंतु हे वास्तविक सुख नव्हे.

          तमोगुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर, कर्म करणारा अज्ञानी असतो. म्हणून त्याने केलेल्या सर्व कर्माची परिणती वर्तमान दुःखामध्येच होते आणि नंतर तो पशुयोनीत पतित होतो. मायेच्या प्रभावामुळे जरी पशृंना कळत नसले तरी पशुजीवन हे सदैव दु:खमयच असते. निष्पाप प्राण्यांची हत्यासुद्धा तमोगुणामुळेच घडते. जनावरांची कत्तल करणारा जाणत नाही की, भविष्यामध्ये तो हत्या करीत असलेल्या पशूला असा योग्य देह प्राप्त होईल, ज्यायोगे तो त्याची हत्या करील. हा प्रकृतीचा नियमच आहे. मानवसमाजामध्ये जर एकाने दुस-याचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. हा राष्ट्राचा नियमच असतो. अज्ञानामुळे लोक जाणत नाहीत की, भगवंतांद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण केले जाते. प्रत्येक सजीव प्राणी हा भगवंतांच्या पुत्रासमान लागते. म्हणून जिहव-लौल्याच्या तृप्तीसाठी पशुवध करणे म्हणजे गाढ अज्ञानच होय. मनुष्याला पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही. कारण परमेश्वराने अनेक सुंदर पदार्थाचा पुरवठा केला आहे. कोणत्याही प्रकारे मनुष्य जर मांस भक्षण करीत असेल तर तो अज्ञानीच असल्याचे जाणावे. असा मनुष्य आपले भविष्य अत्यंत अंधकारमय करीत आहे. सर्व प्रकारच्या पशुवधांमध्ये गोहत्या ही सर्वांत अधम आहे, कारण गाय आपल्याला दूध देऊन सर्व प्रकारचे सुख देते. गो-हत्या करणे म्हणजे प्रगाढ अज्ञानमयी कर्म होय. वेदांमधील (ऋग्वेद ९.४.६४) गोभिः प्रीणित-मत्सरम्-हे शब्द दर्शवितात की, जो मनुष्य दुधाने पूर्णपणे तृप्त होऊन, गोवध करण्याची इच्छा करतो तो घोर अज्ञानात आहे. वेदांमध्ये एक प्रार्थनाही आहे की,

नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च।
जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नम:।।

'हे भगवन्! तुम्ही गाय आणि ब्राह्मणांचे तसेच अखिल मानवाचे आणि जगाचेही हितेच्छू आहात.' (विष्णुपुराण १.१९६५) या श्लोकाचे तात्पर्य आहे की, यामध्ये गाय आणि ब्राह्मणांच्या संरक्षणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ब्राह्मण हे आध्यात्मिक विद्येचे प्रतीक आहेत आणि गाय ही महत्वपूर्ण अन्नपदार्थाचे प्रतीक आहे. या दोन जीवमात्रांना सर्व प्रकारे रक्षण दिलेच पाहिजे आणि हा संस्कृतीचा खरोखर उत्कर्ष आहे. आधुनिक मानवसमाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाकडे दुर्लक्ष केले जाते आणि गो-हत्येला प्रोत्साहन देण्यात येते. यावरून आपण जाणले पाहिजे की, मानवसमाज चुकीच्या दिशेने प्रगती करीत आहे आणि स्वतःच्याच विनाशाचा मार्ग मोकळा करीत आहे. जी संस्कृती आपल्या नागरिकांना पुढील जन्मी पशू बनण्यासाठी मार्गदर्शन करते ती निश्चितच मानव संस्कृती नाही. अर्थात, आधुनिक संस्कृतीची रजोगुण व तमोगुण यांच्या प्रभावामुळे पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे. हे युग अत्यंत भयदायी आहे आणि मानवतेला या भयापासून वाचविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी समाजाला अत्यंत सुगम अशा कृष्णभावनामृताचा मार्ग प्रदान केला पाहिजे.

« Previous Next »