TEXT 4
sarva-yoniṣu kaunteya
mūrtayaḥ sambhavanti yāḥ
tāsāṁ brahma mahad yonir
ahaṁ bīja-pradaḥ pitā
सर्व-योनिषु-सर्वं योनींमध्ये; कौन्तेय-हे कौंतेया; मूर्तयः -रूपे; सम्भवन्ति-प्रकट होतात; याः-जे; तासाम्--ते सर्व; ब्रह्म-ब्रह्म; महत् योनिः--महत्-तत्त्वामधील जन्माचा स्रोत; अहम्-मी; बीज-प्रदः-बीज प्रदान करणारा; पिता-पिता.
हे कोंतेय! भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे.
तात्पर्य: या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणिमात्र म्हणजे अपरा प्रकृती आणि परा प्रकृतीचा संयोग होय. असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकांवर आढळतात. भूमी, पाणी, अग्नी इत्यादी सर्वत्र ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृतीमातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते. तात्पर्य हेच आहे की, भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्तिसमयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात.