No edit permissions for मराठी

TEXT 11

yatanto yoginaś cainaṁ
paśyanty ātmany avasthitam
yatanto ’py akṛtātmāno
nainaṁ paśyanty acetasaḥ

यतन्तः—प्रयत्न करताना; योगिनः—योगिजन; —सुद्धा; एनम्—हे; पश्यन्ति-पाहू शकतात; आत्मनि-स्वत:मध्ये; अवस्थितम्-स्थित; यतन्तः-प्रयत्न करताना; अपि-जरी; अकृतआत्मानः—आत्मसाक्षात्काररहित; -नाही; एनम्-हे; पश्यन्ति-पाहू शकतात; अचेतसः-- अविकसित मन असल्यामुळे.

प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगिजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात;परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत.

तात्पर्य: आत्म-साक्षात्काराच्या पथावर अनेक योगिजन आहेत; परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाहीत, ते जीवाच्या देहामध्ये बदल कसे होत असतात हे पाहू शकत नाहीत. या संदर्भात योगिन: हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सद्यस्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत; परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे, जर शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात, या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते. अशा तथाकथित योगिजनांना यतन्तोऽप्यकृतात्मान: असे संबोधले जाते. ते जरी तथाकथित योगपद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत. असे लोक आत्म्याचे देहांतर कसे होते हे जाणू शकत नाहीत. जे वास्तविकपणे योगपद्धतीचा अभ्यास करीत आहेत आणि ज्यांना आत्मा, प्रकृती व भगवंत यांचा साक्षात्कार झाला आहे किंवा दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, जे विशुद्ध कृष्णभावनाभावित भक्तीमध्ये संलग्न झालेले भक्तियोगी आहेत, त्यांनाच केवळ हे सर्व कशा प्रकारे घडत आहे याचे आकलन होते.

« Previous Next »