No edit permissions for मराठी

TEXT 17

uttamaḥ puruṣas tv anyaḥ
paramātmety udāhṛtaḥ
yo loka-trayam āviśya
bibharty avyaya īśvaraḥ

उत्तमः-उत्तम; पुरुषः-पुरुष; तु-परंतुः अन्यः-दुसरा; परम-परम; आत्मा-आत्मा; इति-याप्रमाणे; उदाहुतः-म्हटला जातो; यः-जो; लोक-विश्वाचा; त्रयम्-तीन विभाग; आविश्य-प्रवेश करून; बिभर्ति-पालन करीत आहे; अव्ययः-अविनाशी; ईश्वरः-भगवान.

या दोहोंव्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत.

तात्पर्य: या श्लोकाची संकल्पना कठोपनिषदात (२.२.१३) आणि श्वेताश्वतरोपनिषदात (६.१३) सुंदर रीतीने विशद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, असंख्य जीवांमध्ये काही बद्ध आहेत तर काही मुक्त आहेत आणि या सर्वांच्याहून श्रेष्ठ असा परमात्मा पुरुषोत्तम आहे. उपनिषदातील श्लोक पुढीलप्रमाणे आहे नित्यो नित्यानां चंतनश्चेतनानामू तात्पर्य असे आहे की, सर्व बद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष, पुरुषोत्तम भगवान आहे, जो सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यांचे पालनही करतो. तेच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मारूपाने स्थित आहेत. जो बुद्धिमान मनुष्य त्यांना जाणू शकतो तोच केवळ परिपूर्ण शांती प्राप्त करण्यास पात्र आहे, अन्य कोणीही नाही.

« Previous Next »