No edit permissions for मराठी

TEXT 7

pravṛttiṁ ca nivṛttiṁ ca
janā na vidur āsurāḥ
na śaucaṁ nāpi cācāro
na satyaṁ teṣu vidyate

प्रवृत्तिम्-योग्य रीतीने कर्म करणे;-सुद्धा; निवृत्तिम्-अयोग्यपणे कर्म न करणे;-आणि; जना:-लोक; -कधीही नाही; विदुः-जाणतात; आसुरा:-आसुरी गुणांनी युक्त असलेले; न-कधीही नाही; शौचम्-शुची, -नाही; अपि-सुद्धा; -आणि; आचार:- आचरण; -कधीही नाही; सत्यम्-सत्य; तेषु-त्यांच्यामध्ये; विद्यते-असते.

आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही.

तात्पर्य: प्रत्येक सुसंस्कृत मानवसमाजात शास्त्रसंमत विधिविधाने आहेत आणि त्यांचे प्रारंभापासूनच पालन केले पाहिजे. विशेषतः वैदिक संस्कृतीचा स्वीकार करणा-या आणि अत्यधिक सुसंस्कृत मानल्या जाणा-या आर्य लोकांमध्ये जे शास्त्रविधानांचे पालन करीत नाहीत  त्यांना आसुरी मानले जाते. यास्तव या श्लोकामध्ये म्हटले आहे की, असुरांना शास्त्रातील आसुरी लोक शास्त्रनियम जाणत नाहीत आणि जर त्यांच्यापैकी काही जण जाणत असले तरी नियमांचे पालन करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नसते. त्यांना श्रद्धाही नसते किंवा वैदिक आदेशानुसार कर्म करण्याची त्यांची इच्छाही नसते. असुरांमध्ये अंतर्बाह्य शुची नसते. मनुष्यांनी आपले शरीर स्नान, दंतधवन, कपडे बदलणे इत्यादी गोष्टींद्वारे शुचिर्भूत ठेवले पाहिजे. आंतरिक शुचीबद्दल सांगावयाचे तर मनुष्याने सदैव पवित्र हरिनामाचे स्मरण करावे आणि हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे || या महामंत्राचे कीर्तन करावे. परंतु असुरांना  अंतर्बाह्य शुद्धीकरिता असणार्या नियमांचे पालन करणयात मुळीच रूची नसते.

     आचरणाच्या बाबतीत विचार करावयाचा तर मनुसंहितेसारख्या अनेक संहिता मानवसमाजाच्या आचरणाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आजतागायतही हिंदू लोक मनुसंहितेचे पालन करतात. वारसासंबंधी आणि इतर कायदे याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. मनुसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये. याचा अर्थ असा नाही की, स्त्रियांना गूलामाप्रमाणे ठेवावे तर स्त्रिया बालकाप्रमाणे असतात. बालकांनाही स्वातंत्र्य दिले जात नाही परंतु त्यांना काही गुलामांसारखे ठेवले जात नाही. आसुरी लोकांनी आता या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना वाटते की, स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणेच स्वातंत्र्य देण्यात यावे. तरीही असे करण्याने जगाच्या सामाजिक परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही. वस्तुतः स्त्रीला जीवनातील प्रत्येक दशेमध्ये संरक्षण दिले पाहिजे. स्त्रीला कौमार्यावस्थेत पित्याने संरक्षण दिले पाहिजे, यौवनावस्थेत पतीने आणि वृद्धावस्थेत तिच्या पुत्रांनी तिला संरक्षण दिले पाहिजे. मनुंहितेप्रमाणे हेच योग्य सामाजिक आचरण आहे. परंतु आधुनिक शैक्षणिक व्यवस्थेने स्त्रीत्वाची कृत्रिम भ्रामक प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणून मानवसमाजामध्ये विवाह पद्धती ही जवळजवळ एक काल्पनिक गोष्टच झाली आहे. तसेच स्त्रियांचा नैतिक दर्जाही आजकाल चांगला नाही. म्हणून आसुरी लोक समाजाच्या हितार्थ असणा-या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. आसुरी लोक, महर्षीचा अनुभव व त्यांनी घालून दिलेल्या विधिनियमांचे पालन करीत नसल्यामुळे त्यांची सामाजिक स्थिती ही अतिशय दयनीय झाली आहे.

« Previous Next »