No edit permissions for मराठी

TEXT 6

dvau bhūta-sargau loke ’smin
daiva āsura eva ca
daivo vistaraśaḥ prokta
āsuraṁ pārtha me śṛṇu

द्वौ-दोन; भूत-सर्गी-सृष्ट जीव; लोके-जगतामध्ये; अस्मिन्-हे; दैवः-दैवी; आसुरःआसुरी; एव-निश्चितपणे; -आणि; दैवः-दैवी; विस्तरशः-विस्तारपूर्वक; प्रोक्तःसांगितले; आसुरम्-आसुरी; पार्थ-हे पृथापुत्र; मे-माझ्याकडून; श्रृणु-ऐक.

हे पार्थ!या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो दैवीगुणयुक्त जन्मलेल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आणि आता ते आसुरी प्रवृत्तीचे वर्णन करीत आहेत. या जगतामध्ये बद्ध जीवांचे दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे लोक दैवी गुणांसह जन्मास आले आहेत ते संयमित जीवन जगतात. अर्थात, ते गुरू, साधू आणि शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मनुष्याने प्रमाणित शास्त्रांनुसार आपली कर्तव्ये केली पाहिजेत. जो शास्त्रसंमत नियामक तत्त्वांचे पालन न करता स्वत:च्या लहरीप्रमाणे कर्म करतो तो आसुरी प्रवृत्तींनी युक्त असल्याचे म्हटले जाते. शास्त्रसंमत नियामक तत्वांचे पालन करणे हीच एकमेव कसोटी आहे. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की, देव आणि दानव दोघांचाही प्रजापतीपासून जन्म झाला. या दोहोंतील फरक हाच आहे की एक वर्ग वेदसंमत आदेशांचे पालन करतो तर दुसरा करीत नाही.

« Previous Next »