No edit permissions for मराठी
TEXT 12
abhisandhāya tu phalaṁ
dambhārtham api caiva yat
ijyate bharata-śreṣṭha
taṁ yajñaṁ viddhi rājasam
अभिसन्धाय-इच्छा ठेवून; तु-परंतु; फलम्-फळाची; दम्भ-दंभ; अर्थम्-च्या साठी; अपि-सुद्धा; च-आणि; एव-निश्चितपणे; यत्-जे; इज्यते-केले जाते; भरत-श्रेष्ठ-हे भरतश्रेष्ठा; तम्—ते, यज्ञम्—यज्ञ; विद्धि—जाण; राजसम्—राजसिक गुणामध्ये
परंतु, हे भरतश्रेष्ठा! दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाणा.
तात्पर्य: काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरिता किंवा इहलोकी लाभप्राप्ती करण्यासाठी केले जातात. असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक असल्याचे समजले जाते.