TEXT 13
vidhi-hīnam asṛṣṭānnaṁ
mantra-hīnam adakṣiṇam
śraddhā-virahitaṁ yajñaṁ
tāmasaṁ paricakṣate
विधि-हीनम्-शास्त्रविधी सोडून; असृष्ट-अन्नम्-प्रसाद वितरित केल्यावाच्चून; मन्त्र-हीनम्-मंत्राविना; अदक्षिणम्-उपाध्यायांना दक्षिणा न देता; श्रद्धा-श्रद्धा; विरहितम्-विरहित; यज्ञम्-यज्ञ; तामसम्-तमोगुणी; परिचक्षते-मानला पाहिजे.
शास्त्रविधींची उपेक्षा करून, प्रसाद वितरित केल्यावाचून, मंत्रोच्चारण न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो.
तात्पर्य : तामस श्रद्धा म्हणजे वास्तविकपणे अश्रद्धाच होय. कधी कधी लोक केवळ धनार्जनासाठी देवतांची उपासना करतात आणि मग ते धन शास्त्रविधींचे उल्लंघन करून मनोरंजन करण्यामध्ये खर्च करतात. धार्मिकतेच्या अशा प्रदर्शनाला किंवा देखाव्याला वास्तविक मानता येत नाही. असा देखावा निव्वळ तामसिक असतो. यामुळे आसुरी प्रवृत्ती निर्माण होते आणि मानवसमाजाला यांच्यापासून मुळीच लाभ होत नाही.