No edit permissions for मराठी

TEXT 14

deva-dvija-guru-prājña-
pūjanaṁ śaucam ārjavam
brahmacaryam ahiṁsā ca
śārīraṁ tapa ucyate

देव-भगवंत; द्विज-ब्राह्मण; गुरु-आध्यात्मिक गुरू; प्राज्ञ-पूज्य व्यक्ती; पूजनम्-पूजा; शौचम्-पावित्र्य, आर्जवम्-सरळपणा; ब्रह्मचर्यम्‌ - ब्रह्मचर्य; अहिंसा-अहिंसा; -सुद्धा; शारीरम्—शारीरिकः तपः-तपः उच्यते—म्हटले जाते.

भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरू व मातापित्यांसारख्या जेष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.

तात्पर्य: या ठिकाणी भगवंत विविध प्रकारच्या तपस्यांचे वर्णन करीत आहेत. सर्वप्रथम ते शारीरिक तपाचे वर्णन करतात. मनुष्याने भगवंत किंवा देवदेवता, सिद्ध विद्वज्जनांना, ब्राह्मणांना आध्यात्मिक गुरूंना आणि मातापित्यासारख्या ज्येष्ठांना व वेदपारंगत कोणत्याही व्यक्तीला वंदन केले पाहिजे. या सर्वांना योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे, अंतर्बाह्य शुची ठेवली पाहिजे आणि आपले आचरण सरळ ठेवले पाहिजे. शास्त्रसंमत नसलेली कोणतीही गोष्ट त्याने करू नये. वैवाहिक संबंधाव्यतिरित अन्यत्र कुठेही त्याने लैंगिक संबंध राखू नयेत, कारण विवाहांतर्गत लैंगिक संबंधच केवळ शास्त्रसंमत आहेत. यालाच ब्रह्मचर्य असे म्हटले जाते. शरीराच्या बाबतीत विचार केल्यास हे सर्व शारीरिक तप आहेत.

« Previous Next »