No edit permissions for मराठी

TEXT 21

pṛthaktvena tu yaj jñānaṁ
nānā-bhāvān pṛthag-vidhān
vetti sarveṣu bhūteṣu
taj jñānaṁ viddhi rājasam

पृथक्त्वेन-विभाजनामुळे; तु-परंतुः यत्-जे; ज्ञानम्-ज्ञान; नाना-भावान्-वेगवेगळया अवस्थाना; पृथक्-विधान्—विभिन्न; वेत्ति—जाणतो; सर्वेषु—सर्व, भूतेषु—जीवांमध्ये; तत्—ते; ज्ञानम्-ज्ञान; विद्धि-जाण, राजसम्-राजस.

ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरांत भिन्न-भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण,

तात्पर्य: भौतिक शरीर म्हणजेच जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतनादेखील नष्ट होते ही कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान होय. या ज्ञानानुसार एका शरीराहून दुसरे शरीर भिन्न असते, कारण दोन शरीरांमधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो; अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची भिन्न वस्तू नसते. शरीरच आत्मा आहे आणि शरीरापलीकडे वेगळा असा आत्मा नाही. अशा ज्ञानानुसार चेतना अनित्य आहे किंवा आत्मा व्यक्तिगतरूपात अस्तित्वात नसून एकच सर्वव्यापी आत्मा असतो, जो ज्ञानाने पूर्ण आहे आणि हे शरीर अनित्य अज्ञानामुळे प्रकट झाले आहे किंवा या शरीरापलीकडे एक विशेष व्यक्तिरूप अथवा परमात्म्याचे अस्तित्व नाही. रजोगुणी ज्ञानामुळे वरील सर्व कल्पना उत्पन्न होत असतात.

« Previous Next »