No edit permissions for मराठी

TEXT 3

tyājyaṁ doṣa-vad ity eke
karma prāhur manīṣiṇaḥ
yajña-dāna-tapaḥ-karma
na tyājyam iti cāpare

त्याज्यम्-त्याग करावा; दोष-वत्-दोषयुक्त म्हणून; इति-या प्रकारे; एके-एक वर्ग:कर्म-कर्म; प्राहुः-म्हणतात; मनीषिणः-मोठे विचारवंत; यज्ञ-यज्ञ; दान-दानः तपः-तपस्या; कर्म-कर्म; -कधीच नाही; त्याज्यम्-त्याग करणे; इति-या प्रकारे; -आणि; अपरे-अन्य.

काही विद्वजन घोषित करतात की, सर्व प्रकारच्या सकाम कर्माना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की, यज्ञ, दान, तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये.

तात्पर्य: वैदिक शास्त्रांत अशा अनेक कर्माचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. उदाहरणार्थ, असे म्हटले जाते की, यज्ञात पशूचा बळी देता येतो, पण काहींचे म्हणणे असे आहे की, पशुहत्या ही पूर्णपणे निंद्य आहे. वैदिक शास्त्रांत यज्ञातील पशुहत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञबळी म्हणून मारलेला पशू मरतो असे समजले जात नाही. यज्ञाच्या योगाने पशूला नवीन जीवन प्रदान केले जाते. कधी त्या पशूला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो, तर कधी त्या पशूला तात्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते. परंतु यासंबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. काहीजण म्हणतात की, विशेष यज्ञाकरिता पशुहत्या इष्ट आहे. यज्ञकर्मासंबंधी ही जी सर्व निरनिराळी मते आहेत, त्यांविषयी आता स्वत: भगवंतच स्पष्टीकरण करीत आहेत.

« Previous Next »