No edit permissions for मराठी

TEXT 6

karmendriyāṇi saṁyamya
ya āste manasā smaran
indriyārthān vimūḍhātmā
mithyācāraḥ sa ucyate

कर्म-इन्द्रियाणि- पाच कर्मेद्रिये; संयम्य- संयमित करून; य:- जो कोणी; आस्ते- राहतो; मनसा-मनाद्वारे; स्मरन्- चिंतन करीत; इन्द्रिय -अर्थान्- इंद्रियविषय; विमूढ-मूर्ख; आत्मा-आत्मा; मिथ्या-आचार:-ढोंगी किंवा दांभिक; स:-तो; उच्यते-म्हटला जातो.

जो कर्मेंद्रिये संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रियविषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वत:ची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते.

तात्पर्य: कृष्णभावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियोपभोगाचेच चिंतन करीत असतात, असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. इंद्रियतृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो; पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि, आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रियोपभोगांच्या विषयांच्या शोधात असतो. तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडीमात्रही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते. म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडीमात्रही किंमत नाही.

« Previous Next »