No edit permissions for मराठी

TEXT 15

evaṁ jñātvā kṛtaṁ karma
pūrvair api mumukṣubhiḥ
kuru karmaiva tasmāt tvaṁ
pūrvaiḥ pūrva-taraṁ kṛtam

 
एवम्- याप्रमाणे; ज्ञात्वा-चांगले जाणून; कृतम्-केले; कर्म-कर्म; पूर्वै:- पूर्वकाळातील अधिकृत लोकांनी; अपि-सुद्धा; मुमुक्षुभि:- ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे; कुरु-कर; कर्म-नियत कर्म; एव-निश्‍चितच; तस्मात्-म्हणून; त्वम्-तू; पूर्वै:-पूर्वजांनी; पूर्व-तरम्-प्राचीन काळी; कृतम्-ज्याप्रमाणे केले.

प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिह्नांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे.

तात्पर्य: मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. त्यापैकी काहीजणांचे अंत:करण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काहीजण विषयेच्छेपासून मुक्त झालेले असतात. कृष्णभावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्णभावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्णभावनेमध्ये कर्म करू शकतात. जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील व याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्णभावनेमतील नवसाधकांना अनेकदा कृष्णभावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्धकर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्णभावनायुक्त कर्मांतून निवृत्त होऊन कृष्णभावनेचा देखावा करीत बसणे हे महत्वपूर्ण नाही, त्यापेक्षा श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वपूर्ण आहे. याठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव विवस्वनासारख्या भगवंतांच्या पूर्वशिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरुन अर्जुनाने कृष्णभावनाभावित कर्म करावे. भगवंत आपल्या सर्व पूर्वकर्मांना जाणतात तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्णभावनाभावित होऊन कर्म केले त्यांचे कर्मही ते जाणतात. म्हणून ते सूर्यदेवांच्या कर्मांचे अनुसरण करण्याची शिफारस करतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षांपूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते.

« Previous Next »