No edit permissions for मराठी

TEXT 9

suhṛn-mitrāry-udāsīna-
madhyastha-dveṣya-bandhuṣu
sādhuṣv api ca pāpeṣu
sama-buddhir viśiṣyate

सु-हृत्-स्वभावत:च हितचिंतक; मित्र-स्नेहमयी हितकारी; अरि-शत्रू; उदासीन-स्पर्धकांमधील तटस्थ; मध्य-स्थ-स्पर्धकांमधील मध्यस्थ; द्वेष्य-द्वेषी; बन्धुषु-आणि नातेवाईक किंवा हितचिंतक; साधुषु-पुण्यवान किंवा साधूमध्ये; अपि-सुद्धा; -आणि; पापेषु-पापीमध्ये; सम-बुद्धि:- समबुद्धी असलेला; विशिष्यते-अत्यंत प्रगत असतो.

मनुष्य जेव्हा प्रमाणिक हितचिंतक, सुहृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र आणि शत्रू, पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो.

« Previous Next »