No edit permissions for मराठी

TEXT 19

sa ghoṣo dhārtarāṣṭrāṇāṁ
hṛdayāni vyadārayat
nabhaś ca pṛthivīṁ caiva
tumulo ’bhyanunādayan

:-तो; घोष:- ध्वनी; धार्तराष्ट्राणाम् - धृतराष्ट्राच्या पुत्रांची; हृदयानि-हृदये; व्यदारयत्-विदीर्ण केली; नभ:-आकाशाला; -सुद्धा; पृथिवीम् -पृथ्वीतल; -सुद्धा; एव-निश्चितच; तुमुल:- निनाद; अभ्यनुनादयन्-दुमदुमून गेला.

हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली.

तात्पर्य: दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला, तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही; परंतु या विशिष्ट श्‍लोकामध्ये पांडवपक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्‍वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही.

« Previous Next »