No edit permissions for मराठी

TEXT 24

sañjaya uvāca
evam ukto hṛṣīkeśo
guḍākeśena bhārata
senayor ubhayor madhye
sthāpayitvā rathottamam

सञ्चय: उवाच-संजय म्हणाला; एवम्-याप्रमाणे; उक्त:- म्हटल्यावर; हृषीकेश:-भगवान श्रीकृष्ण; गुडाकेशेन-अर्जुनाने; भारत-हे भरतवंशजा; सेनयो:-सैन्याच्या; उभयो:- दोन्ही; मध्ये-मध्यभागी; स्थापयित्वा-उभा करून; रथ्-उत्तमम्-सर्वोत्तम रथ.

संजय म्हणाला: हे भरतवंशजा! या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला.

तात्पर्य: या श्‍लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरु शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवद्भक्त हा भगवान श्रीकृष्ण, त्यांचे नाम, रूप, गुण आणि लेला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने, श्रीकृष्णांचे सतत स्मरण करुन कृष्णभक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच ‘कृष्णभावना’ किंवा समाधि असे म्हणतात. हृषीकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले.

« Previous Next »