No edit permissions for मराठी

TEXT 25

bhīṣma-droṇa-pramukhataḥ
sarveṣāṁ ca mahī-kṣitām
uvāca pārtha paśyaitān
samavetān kurūn iti

भीष्म-पितामह भीष्म; द्रोण-द्रोणाचार्य; प्रमुखत:-च्या समोर; सर्वेषाम्-सर्व; -सुद्धा; मही-क्षिताम्-जगातील राजे; उवाच-म्हणाले; पार्थ-हे पार्थ; पश्य-पाहा; एतान्-या सर्वांना; समवेतान् - एकत्रित; कुरून्-कुरुवंशातील सदस्य; इति-याप्रमाणे

भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ! येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा.

तात्पर्य: सर्व जीवांचे परमात्मास्वरुप असल्याने भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले. या संदर्भात हृषीकेश या शब्दाप्रयोगावरून कळून येते की, त्यांना सर्व काही ज्ञान होते. आणि अर्जुनाच्या संदर्भात ‘पार्थ’ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की, अर्जुन हा त्यांच्या आत्येचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता ‘उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा,’ असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावयाचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या, पृथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते.

« Previous Next »