TEXT 26
tatrāpaśyat sthitān pārthaḥ
pitṝn atha pitāmahān
ācāryān mātulān bhrātṝn
putrān pautrān sakhīṁs tathā
śvaśurān suhṛdaś caiva
senayor ubhayor api
तत्र-त्या ठिकाणी; अपश्यत्-त्याने पाहिले; स्थितान्-उभे असलेले; पार्थ:- अर्जुन; पितृन्-वाडवडील; अथ-सुद्धा; पितामहान्-पितामह; आचार्यान्-गुरु, शिक्षक; मातुलान्- मामे; भ्रातृन्-भाऊ; पुत्रान्-पुत्र; पौत्रान्-नातवंडे; सखीन्-मित्र; तथा-तसेच; श्वशुरान्-सासरे; सृहृद:-हितचिंतक; च-सुद्धा; एव-निश्चित; सेनयो:-सैन्यामध्ये; उभयो:- दोन्ही पक्षांमधील; अपि-सहित.
त्याठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये, आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले.
तात्पर्य: अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्व त्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक, इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले.