TEXT 39
kula-kṣaye praṇaśyanti
kula-dharmāḥ sanātanāḥ
dharme naṣṭe kulaṁ kṛtsnam
adharmo ’bhibhavaty uta
कुल-क्षये-कुळाचा नाश होण्यामुळे; प्रणश्यन्ति-नष्ट होतात; कुल-धर्मा:- कुलधर्म, वंशपरंपरा; सनातना:- शाश्वत; धर्मे-धर्म; नष्टे-नष्ट झाल्यावर; कुलम्-कुळाचे; कृत्स्नम्-संपूर्ण, सर्व; अधर्म:-अधर्म; अभिभवति-बदल होतो; उत-असे म्हटले जाते.
कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते.
तात्पर्य: कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास साहय्यक अशा धार्मिक परंपेरेबद्दलची अनेक तत्त्वे वर्णाश्रमसंस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंशपरंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये.