TEXT 44
aho bata mahat pāpaṁ
kartuṁ vyavasitā vayam
yad rājya-sukha-lobhena
hantuṁ sva-janam udyatāḥ
अहो-अरेरे! बत-किती चमत्कारिक आहे; महत्-मोठे; पापम्-पाप; कर्तुम्-करणयास; व्यवसिता:- निर्णय घेतला आहे किंवा ठरविले आहे; वयम्-आम्ही; यत्-कारण की; राज्य-सुख-लोभेन-राज्यसुखाच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे; हन्तुम्-हत्या करण्यासाठी; स्व-जनम्-नातलगांना; उद्यता:- तयार झालो आहोत.
अरेरे! आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे! राज्यसुख भेागण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत.
तात्पर्य: स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वत:च्या बंधूंची, पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. पण अर्जुन हा भगवंतांचा साधुवृत्तियुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्त्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे.