No edit permissions for मराठी

TEXT 2

bhavāpyayau hi bhūtānāṁ
śrutau vistaraśo mayā
tvattaḥ kamala-patrākṣa
māhātmyam api cāvyayam

भव—उत्पत्ती, अप्ययौ—लय (प्रलय); हि-निश्चितपणे, भूतानाम्—सर्व जीवांचा; श्रुतौ— ऐकले आहे; विस्तरशः-सविस्तरपणे;मया-मी; त्वतः-तुमच्याकडून; कमल-पत्र-अक्ष-हे कमलनयना; माहात्म्यम्-माहात्म्य; अपि-सुद्धा; -आणि; अव्ययम्-अविनाशी,

हे कमलनयना! जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी माहात्म्याची अनुभूतीही झाली आहे.

तात्पर्य: अत्यानंदित होऊन अर्जुन या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना 'कमलनयना' (श्रीकृष्णांचे नेत्र कमळासारखे दिसतात) म्हणून संबोधित आहे, कारण पूर्वीच्या अध्यायात श्रीकृष्णांनी निश्चितपणे सांगितले आहे की, अहंकृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा-'या संपूर्ण भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण मीच आहे.' अर्जुनाने याबद्दलचे सविस्तर वर्णन भगवंतांकडून ऐकले आहे. अर्जुनाला हे सुद्धा माहीत आहे की, भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वांपासून ते अलिप्त आहेत. नवव्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्वव्यापी आहेत; पण तरीही व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत. हेच श्रीकृष्णांचे अचिंत्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्ण समजल्याचे मान्य केले आहे.

« Previous Next »