No edit permissions for मराठी

TEXT 43

pitāsi lokasya carācarasya
tvam asya pūjyaś ca gurur garīyān
na tvat-samo ’sty abhyadhikaḥ kuto ’nyo
loka-traye ’py apratima-prabhāva

पिता-पिता; असि-तुम्ही आहात; लोकस्य-संपूर्ण जगताचा; चर-चर किंवा सचल; अचरस्य-आणि अचर किंवा अचल; त्वम्-तुम्ही आहात; अस्य-या; पूज्यः-पूज्य; -सुद्धा; गुरु:-गुरू; गरीयान्-यशस्वी, स्तुत्य; -कधीच नाही; त्वत्-सम:-तुमच्यासमान; अस्ति-आहे; अभ्यधिकः-श्रेष्ठ; कुतः-कसे शक्य आहे; अन्यः-अन्य; लोक-त्रयेत्रैलोक्यात; अपि-सुद्धा; अप्रतिम-प्रभाव-हे अपरिमित शक्ती,

तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरू तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता! त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल?

तात्पर्य: ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही पूजनीय आहेत. श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरू आहेत, कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले. आणि आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. म्हणून ते आद्य गुरू आहेत आणि वर्तमानकाळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरूने श्रीकृष्णांपासून चालत येणा-या गुरुशिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यावाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरू होऊ शकत नाही.

भगवंतांना सर्व प्रकारे नमस्कार केला जातो. त्यांचा महिमा अगाध आहे. भगवान श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही, कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो, त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच होऊ शकत नाही. श्वेताश्वतरोपनिषदात (६.८) हेच सांगितले आहे.

तस्य कार्य करणं च विद्यते।
न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते

साधारण मनुष्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिये आहेत; परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये, शरीर, मन आणि ते स्वत: यांत कोणताही भेद नाही. जे मूख लोक त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत, ते म्हणतात की, श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा, मन, अंत:करण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत. श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या लीला आणि शक्ती परमश्रेष्ठ आहेत. असेही सांगण्यात आले आहे की, श्रीकृष्णांची इंद्रिये जरी आपल्याप्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात. म्हणून त्यांची इंद्रिये अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाहीत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही किंवा त्यांच्याबरोबरीचा कोणीही नाही आणि सर्वजण त्यांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत.

भगवंतांचे ज्ञान, बल आणि कर्म, सर्व काही दिव्य आहे. भगवद्गीतेत (४.९) सांगितल्याप्रमाणे -

जन्म कर्म च म दिव्यमेव यो वेत्ति तत्त्वतः /
त्यक्त्वा देहं पुनजर्न्म नैतिमेति सोऽर्जुन /

श्रीकृष्णांचा देह, कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की, श्रीकृष्णांचे कर्म हे इतरांपेक्षा निराळे आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रीकृष्णांच्या आदेशांचे पालन करणे, जेणेकरून मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होईल. असेही सांगण्यात चरितामृतातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे, (आदि ५.१४२) एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य-केवळ श्रीकृष्ण एकच ईश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत. सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत आहेत. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच सर्व कारणांचे कारण आहेत.

« Previous Next »