No edit permissions for मराठी

TEXT 8

na tu māṁ śakyase draṣṭum
anenaiva sva-cakṣuṣā
divyaṁ dadāmi te cakṣuḥ
paśya me yogam aiśvaram

-कधीच नाही; तु-परंतु; माम्-मला; शक्यसे-शक्य आहेस; द्रष्टुम्-पाहण्यास; अनेन-या; एव-खचितच; स्व-चक्षुषा-तुझ्या स्वत:च्या नेत्रांनी; दिव्यम्-दिव्य; ददामि-मी देतो; ते-तुला; चक्षुः -नेत्र; पश्य-पाहा; मे-माझे; योगम्ऐश्वरम्-योग ऐश्वर्य.

परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पाहा!

तात्पर्य: शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करीत नाही. श्रीकृष्णांच्या कृपेनेच, भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. श्रीकृष्णांचे विराटरूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास सांगण्यात आले. श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाही; आणि हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल. तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने, विराटरूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात.

          ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे, ते नसते. ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तलीन झालेले असतात की, श्रीकृष्ण स्वतः श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरुपामुळे आकृष्ट होतात. त्यांचे सवंगडी, सखा, मातापिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर्य प्रकट करावे अशी मुळीच इच्छा पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. आपल्या दिव्य प्रेमाच्या आदानप्रदानामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्याचे सुद्धा त्यांना विस्मरण झाले होते. श्रीमद्‌भागवतात म्हटले आहे की, श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करणारे गोपगण हे अत्यंत पुण्यवान होते आणि अनेकानेक जन्मांनंतर त्यांना श्रीकृष्णांशी क्रीडा करण्याची संधी प्राप्त झाली होती. अशा गोप बालकांना श्रीकृष्ण हे भगवान असल्याचे माहीत नव्हते. ते श्रीकृष्णांना आपला जिवलग सखा मानतात. म्हणून शुकदेव गोस्वामी एका श्लोकामध्ये म्हणतात.

इत्थं सतां ब्रह्म-सुखानुभूत्या दास्य गताना परदैवतेन ।
मायाश्रितांना नरदारकेण साकं विजहु: कृत-पुण्य-पुञ्जा:।।

          ‘'परमेश्वराला मोठमोठे ऋषिगण हे निर्विशेष ब्रह्म, भक्तगण हे पुरुषोत्तम भगवान आणि जनसामान्य हे मायाधीन असल्याचे मानतात. या बालकांनी गतजन्मांमध्ये अनेकानेक पुण्यकर्मे केल्यामुळे ते आता पुरुषोत्तम श्रीभगवंतांशी क्रीडा करीत आहेत' (श्रीमद्भागवत १०.१२.११)

          वस्तुस्थिती ही आहे की, भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात; यामुळे भविष्यकाळातील लोक जाणू शकतील की, श्रीकृष्णांनी स्वत:ला केवळ सिद्धांतरूपाने किंवा तात्विकदृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही तर स्वत:चे मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता. जे खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांना अर्जुनाच्या पदचिह्नांचे अनुसरण करण्याची इच्छा आहे. त्यांनी जाणले पाहिजे की, श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांतरूपाने स्वत:ला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केले नाही तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले.

भगवंतांनी आपले विश्वरूप पाहण्याकरिता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली, कारण आम्ही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, भगवंतांना माहीत होते की, अर्जुन विराटरूप पाहण्यास विशेष इच्छुक नव्हता.

« Previous Next »