No edit permissions for मराठी

TEXT 7

ihaika-sthaṁ jagat kṛtsnaṁ
paśyādya sa-carācaram
mama dehe guḍākeśa
yac cānyad draṣṭum icchasi

इह-या; एक-स्थम्—एकाच स्थानी; जगत्-जगत; कृत्स्नम्-संपूर्ण; पश्य—पाहा; अद्य-त्वरित; -सहित; चर-चर; अचरम्-आणि अचर; मम-माझ्या; देहे-या देहामध्ये; अर्जुना; यत्-जे; -सुद्धा; अन्यत्-अन्य; द्रधुम्-पाहण्यास; इच्छसि—इच्छा

हे अर्जुना! तू जे काही पाहू इच्छितोस, ते आता माझ्या या देहामध्ये पाहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे.

तात्पर्य: एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य नाही. अत्यंत प्रगत झालेला वैज्ञानिकही विश्वाच्या इतर भागात काय चालले आहे हे पाहू शकत नाही; परंतु अर्जुनासारखा भक्त विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व यच्चयावत गोष्टी पाहू शकतो. भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहावयाचे आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करतात. याप्रमाणे श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकत होता.

« Previous Next »