No edit permissions for मराठी

TEXT 14

sarvataḥ pāṇi-pādaṁ tat
sarvato ’kṣi-śiro-mukham
sarvataḥ śrutimal loke
sarvam āvṛtya tiṣṭhati

सर्वतः-सर्वत्र; पाणि-हात; पादम्-पाय; तत्-ते; सर्वतः-सर्वत्र; अक्षि-नेत्र; शिरः-मस्तक; मुखम्-मुखे; सर्वतः-सर्वत्र; श्रुति-मत्-कान असलेले; लोके-या जगतात; सर्वम्‌-सर्व; आवृत्य-व्यापून; तिष्ठति-राहिले आहे.

सर्वत्र त्यांचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. याप्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे.

तात्पर्य: ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठायी ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव स्थित आहेत. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत. हे सर्व जीव परमात्म्याच्या ठायी आणि परमात्म्यावर स्थित आहेत. म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे. तरीही जीव म्हणू शकत नाही की, माझे हात पाय आणि नेत्र हे सर्वत्र आहेत. हे शक्य नाही. जर त्याला वाटत असेल की, केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहीत नाही की, आपलेही हात, पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत. परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल, तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे. याचा अर्थ आहे की, भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो; परंतु जीव असे करू शकत नाही. भगवद्‌गीतेत भगवंत सांगतात की, जर मनुष्याने त्यांना फूल, फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत सांगतात की, मनुष्याने त्याना फूल, फळ दूर असतील तर ते हे सर्व कसे स्वीकारू शकतात? हेच भगवंतांचे सर्वशक्तिमान रूप आहे, जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरिता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात. हीच त्यांची शक्ती आहे. ब्रह्मसंहितेत (५.३७) म्हटले आहे, गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतः-जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्वव्यापी आहेत. जीव म्हणू शकत नाही की, मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा श्रीभगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नव्हे.

« Previous Next »