No edit permissions for मराठी

TEXT 13

jñeyaṁ yat tat pravakṣyāmi
yaj jñātvāmṛtam aśnute
anādi mat-paraṁ brahma
na sat tan nāsad ucyate

ज्ञेयम्-ज्ञेय; यत्-जे; तत्-ते; प्रवक्ष्यामि-मी आता वर्णन करून सांगतो; यत्-जे; ज्ञात्वाजाणून; अमृतम्-अमृत; अश्नुते-मनुष्य आस्वादन करतो; अनादि-अनादी; मत्-परम्-माझ्या अधीन; ब्रह्म-ब्रह्म; -तसेच; सत्-कारण; तत्-ते; -तसेच; असत्-कार्यः; उच्यते-असल्याचे म्हटले जाते.

ज्ञेय, म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य-कारणांच्या पलीकडे आहे.

तात्पर्य: भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे. तसेच क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचेही त्यांनी विवरण केले आहे. आता ते ज्ञेयाचे, प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा, वर्णन करण्यास प्रारंभ करतात. ज्ञेयाच्या ज्ञानाने, आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने, मनुष्य अमृतमयी जीवनाचवे आस्वादन करू शकतो. दुस-या आध्यायात सांगितल्याप्रमाणे जीव हा नित्य आहे. याचीसुद्धा या ठिकाणी पुष्टी करण्यात आली आहे. जीवाला विशिष्ट जन्मकाल नाही, तसेच जीवात्मा भगवंतांपासून केव्हा व्यक्त झाला हे कोणीही जाणू शकत नाही. म्हणून तो अनादी आहे. याला वेद पुष्टी देताना म्हणतात की, न जायते पियते वा विपश्चित्‌ (कठोपनिषद् १.२.१८) क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृतही होत नाही, तो ज्ञानमयी आहे.

          भगवंतांच्या परमात्मा रूपाचेही वेदामध्ये (श्वेताश्वतरोपनिषदात् ६.१६) पुढीलप्रमाणे वर्णन आहे, प्रधान क्षेत्रज्ञपतिगुणेश:-'भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत.' स्मृतीमध्ये म्हटले आहे की, दासभूता हरेरेव नन्यस्वैव कदान् । 'जीव हे नित्यनिरंतर भगवंतांचे सेवकच आहेत. 'श्री चैतन्य महाप्रभूंनी याची आपल्या शिकवणुकीमध्ये पुष्टी केलेली आहे. म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून.योजिला आहे. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजिला जातो, तेव्हा जाणले पाहिजे की, जीव हा आनंदब्रह्म नसून विज्ञानब्रह्म आहे. परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंदब्रह्म असे म्हणतात.

« Previous Next »