No edit permissions for मराठी

TEXT 16

bahir antaś ca bhūtānām
acaraṁ caram eva ca
sūkṣmatvāt tad avijñeyaṁ
dūra-sthaṁ cāntike ca tat

बहि:-बाहेर; अन्तः-अंतरात;-सुद्धा; भूतानाम्-सर्व जीवांच्या; अचरम्-अचर; चरम्-चर; एव-सुद्धा; -आणि; सूक्ष्मत्वात्-सूक्ष्म असल्यामुळे; तत्-ते; अविज्ञेयम्-अज्ञेय; दूर-स्थम्-अत्यंत दूर; -सुद्धा; अन्तिके-जवळ; -आणि; तत्-ते.

परम सत्य हे सर्व चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे, भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या, ग्रहणशक्तीपलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे.

तात्पर्य: वेदांद्वारे आपल्याला कळून येते की, भगवान नारायण हे प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेरही आहेत. आध्यात्मिक तसेच भौतिक जगतात ते उपस्थित आहेत. जरी अत्यंत दूर असले तरी ते आम्हा सर्वांच्या जवळ आहेत. ही वैदिक विधाने आहेत. आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वत: (कठोपनिषद् १.२.२१) आणि ते सदैव दिव्यानंदामध्ये रत असल्यामुळे आपल्या संपूर्ण ऐश्वर्याचा कसा उपभोग घेत आहेत हे आपण जाणू शकत नाही. आपण त्यांना या प्राकृत इंद्रियांद्वारे जाणू किंवा पाहू शकत नाही. म्हणून वेदांमध्ये म्हटले आहे की, त्यांना जाणण्यासाठी आपले प्राकृत मन आणि इंद्रिये अपुरी आहेत. परंतु कृष्णभावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिये शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की, ज्या भक्ताने भगवत्प्रेम प्राप्त केले आहे तो भगवंतांना नित्यनिरंतर पाहू शकतो. भगवद्गीतेतही (११.५०) म्हटले आहे की, केवळ भक्तियोगाद्वारेच त्यांना पाहणे किंवा जाणणे शक्य आहे. भक्त्या त्वनन्यया शक्य: |

« Previous Next »