No edit permissions for मराठी

TEXT 29

samaṁ paśyan hi sarvatra
samavasthitam īśvaram
na hinasty ātmanātmānaṁ
tato yāti parāṁ gatim

समम्—समभावाने; पश्यन्—पाहून;हि—निश्चितपणे, सर्वत्र—सर्वत्र; समवस्थितम्—समरूपाने स्थित असलेला; ईश्वरम्-परमात्मा; -होत नाही; हिनस्ति-हीन किंवा अधोगती; आत्मना-मनाने; आत्मानम्-आत्मा; ततः-नंतर; याति-पोहोचतो; पराम्-दिव्य; गतिम्-गती किंवा लक्ष्य.

जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो.

तात्पर्य: जीवात्म्याने भौतिक जीवनाचा स्वीकार केल्यामुळे त्याची स्थिती ही आध्यात्मिक जीवनातील स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे. परंतु जर मनुष्याने जाणले की, परमेश्वर हा परमात्मा रूपाने सर्वत्र स्थित आहे, अर्थात भगवंतांची उपस्थिती सर्व सजीव वस्तूंमध्ये तो पाहू शकला तर, विनाशकारी प्रवृत्तीमुळे तो स्वत:चे अध:पतन होऊ देत नाही आणि म्हणून हळूहळू त्याची आध्यात्मिक जगतामध्ये उन्नती होते. मन हे सामान्यतया इंद्रियतृप्ती करण्याच्या अधीन झालेले असते, परंतु मन परमात्म्यावर एकाग्र होते तेव्हा मनुष्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते.

« Previous Next »