No edit permissions for मराठी

TEXT 30

prakṛtyaiva ca karmāṇi
kriyamāṇāni sarvaśaḥ
yaḥ paśyati tathātmānam
akartāraṁ sa paśyati

प्रकृत्या-प्रकृतीने; एव-निश्चितपणे; -सुद्धा; कर्माणि-कमें, क्रियमाणानि-केली जातात, सर्वशः—सर्वप्रकारे; यः—जो; पश्यति—पाहतो; तथा—सुद्धा; आत्मानम्-स्वतः; अकर्तारम्— अकर्ता; सः-तो; पश्यति-यथार्थ रूपाने पाहतो.

जो मनुष्य पाहू शकतो की, भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो.

तात्पर्यः परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार भौतिक प्रकृती शरीराची निर्मिती करते आणि मनुष्याच्या शरीराशी संबंधित जी काही कर्मे घडतात, ती त्याच्याद्वारे केली जात नाहीत. सुखासाठी किंवा दुःखासाठी जे काही मनुष्य करतो ते त्याला आपल्या शारीरिक रचनेमुळे करणे भाग पडते. तथापि, आत्मा या शारीरिक क्रियांच्या अतीत असतो. गतकाळातील इच्छेनुसार मनुष्याला वर्तमान देह प्राप्त होतो. इच्छापूर्ती करण्यासाठी त्याला देह प्रदान केला जातो आणि देहाद्वारे तो इच्छेनुसार कर्म करतो. वस्तुतः शरीर म्हणजे भगवंतांनी जीवाच्या इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेले यंत्रच आहे. इच्छांमुळेच मनुष्य कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुखदुःख भोगतो. जेव्हा जीवाच्या ठायी ही दिव्य दृष्टी विकसित होते तेव्हा या दिव्य दृष्टीमुळेच तो शारीरिक क्रियांपासून अलग होतो. ज्याला अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे तोच वास्तविक तत्वदर्शी होय.

« Previous Next »