No edit permissions for मराठी

TEXT 17

ātma-sambhāvitāḥ stabdhā
dhana-māna-madānvitāḥ
yajante nāma-yajñais te
dambhenāvidhi-pūrvakam

आत्म-सम्भाविता:-आत्मतुष्टी किंवा आत्मश्लाघा; स्तब्धाः-उद्धट; धन-मान-धन आणि खोट्या प्रतिष्ठेत; मद-मदामध्ये; अन्विता:-लीन; यजन्ते-ते यज्ञ करतात; नाम-केवळ नाममात्र; यजै:-यज्ञासहित; ते-ते; दम्भेन-दांभिकपणे; अविधि-पूर्वकम्--अविधिपूर्वक

आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता, अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात.

तात्पर्य: शास्त्रप्रमाण इत्यादींना न जुमानता स्वतःलाच सर्वेसर्वा मानून आसुरी लोक कधीकधी तथाकथित धार्मिक यज्ञ अथवा याज्ञिक अनुष्ठाने करतात आणि कोणत्याही प्रमाणावर त्यांचा विश्वास नसल्याने ते अतिशय उद्धट असतात. धन आणि खोटी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे ते मोहित होतात व शास्त्रांचा धिक्कार करू लागतात. असे लोक कधी कधी प्रचारकाची भूमिका निभावतात, लोकांना भुलवितात आणि धर्मसुधारक किंवा परमेश्वराचे अवतार म्हणून प्रसिद्ध होतात. ते केवळ यज्ञाचा दिखावा करतात किंवा देवतांची उपासना करतात अथवा स्वत:च्याच परमेश्वराची निर्मिती करतात. साधारण लोक अशा असुरांची परमेश्वर म्हणून जाहिरात करतात व त्यांची उपासना करतात आणि मूर्ख लोक त्यांना धर्माधिकारी किंवा आध्यात्मिक तत्ववेत्ता मानतात. ते संन्याशाचा वेष परिधान करतात आणि त्या वेषाच्या आधारावर सर्व प्रकारची निंद्य कृत्ये करतात. वस्तुत: जगातून विरक्त झालेल्या मनुष्यावर अनेक बंधने असतात; परंतु आसुरी लोक अशा बंधनांची मुळीच फिकीर करीत नाहीत. त्यांना वाटते की, आपण जो मार्ग निर्माण करतो तोच स्वतःसाठी योग्य आहे. सर्वांना अनुसरण्यास योग्य असा आदर्श मार्गही असू शकतो हे त्यांना मान्य नसते या श्लोकामध्ये अविधिपूर्वकम् या शब्दावर विशेष जोर देण्यात आला आहे. या सर्व गोष्ठी अज्ञान आणि मोहामुलेच होत असतात,

« Previous Next »