No edit permissions for मराठी
TEXT 19
mūḍha-grāheṇātmano yat
pīḍayā kriyate tapaḥ
parasyotsādanārthaṁ vā
tat tāmasam udāhṛtam
मूढ-मूढ; ग्राहेण-प्रयत्नाने, आत्मनः-स्वत:च्या; यत्-जे, पीडया-पीडाकारक; क्रियते-केले जाते; तपः-तप; परस्य-इतरांना; उत्सादन-अर्थम्-विनाश करण्याकरिता; वा-किंवा; तत्–ते; तामसम्—तामसिक; उदाहतम्—म्हटले जाते.
आत्म-पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते.
तात्पर्य: हिरण्यकशिपूसारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली. अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली; परंतु अखेरीस भगवंतांनी त्याचा संहार केला. अशक्यप्राय: गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या होय.