TEXT 20
dātavyam iti yad dānaṁ
dīyate ’nupakāriṇe
deśe kāle ca pātre ca
tad dānaṁ sāttvikaṁ smṛtam
दातव्यम्-देण्यायोग्य, इति-याप्रमाणे; यत्-जे, दानम्-दान, दीयते-दिले जाते; अनुपकारिणे-प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता; देशे-योग्य स्थळी; काले-योग्य काळी; च-सुद्धा; पात्रे-योग्य व्यक्तीला; च-आणि; तत्-ते; दानम्-दान; सात्विकम्-सात्विक; स्मृतम्-म्हटले जाते.
कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते.
तात्पर्य: आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की, दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावाने दिले जाते; परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, पात्र-अपात्र याचा विचारं न करता दान देणे वेदसंमत नाही.