No edit permissions for मराठी
TEXT 40
na tad asti pṛthivyāṁ vā
divi deveṣu vā punaḥ
sattvaṁ prakṛti-jair muktaṁ
yad ebhiḥ syāt tribhir guṇaiḥ
न-नाही; तत्-ते; अस्ति-आहे; पृथिव्याम्-पृथ्वीवर; वा-किंवा; दिवि-उच्चतर लोकामध्ये; देवेषु-देवदेवतांमध्ये; वा-किंवा; पुन:-पुन्हा; सत्त्वम्-अस्तित्व; प्रकृति-जै:- प्रकृतीपासून उत्पन्न; मुक्तम्-मुक्त; यत्-ते; एभिः-यांच्या प्रभावापासून; स्यात्-आहेत; त्रिभिः—तीन; गुणैः—प्राकृतिक गुण.
या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही, जो या प्रकृतीच्या तीन गुणांपासून मुक्त आहे.
तात्पर्य: भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणा-या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांशरूपाने सांगतात.