No edit permissions for मराठी

TEXT 54

arjuna uvāca
sthita-prajñasya kā bhāṣā
samādhi-sthasya keśava
sthita-dhīḥ kiṁ prabhāṣeta
kim āsīta vrajeta kim

अर्जुन:उवाच- अर्जुन म्हणाला; स्थित-प्रज्ञस्य- जो दृढ कृष्णभावनेमध्ये स्थिर झाला आहे; का-काय; भाषा- भाषा; समाधि-स्थस्य-समाधिस्थ झालेला; केशव - हे कृष्ण; स्थित-धी:- कृष्णभावनेमध्ये स्थिर झालेला; किम्- काय; प्रभाषेत - बोलतो; किम् - कसा; आसीत- राहतो; व्रजेत - चालतो; किम् - कसा.

अर्जुन म्हणाला: हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा?

तात्पर्य - ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात त्याचप्रमाणे जो कृष्णभावनायुक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो, त्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात त्याचप्रमाणे दिव्य कृष्णभावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतींत विशिष्ट अशी लक्षणे असतात. भागवद्गीतेवरून एखादा अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णभावनेतील मनुष्य कसा बोलतो? कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की, जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्याक्षणी तो बोलतो त्याचक्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्णभावनाभावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात.

« Previous Next »