No edit permissions for मराठी

TEXT 17

yas tv ātma-ratir eva syād
ātma-tṛptaś ca mānavaḥ
ātmany eva ca santuṣṭas
tasya kāryaṁ na vidyate

:-जो कोणी; तु-परंतु; आत्म-रति:-आत्म्यातच आनंद घेणारा; एवं-निश्चितच; स्यात्-राहतो; आत्म-तृप्त:- आत्मतृप्त; -आणि; मानव:- मनुष्य; आत्मनि-स्वत:मध्ये; एव-केवळ; -आणि; सन्तुष्ट:- पूर्णपणे संतुष्ट झालेला; तस्य-त्याचे; कार्यम्-कर्तव्य आणि कार्य; न-नाही; विद्यते-अस्तित्वात राहते.

पण जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही.

तात्पर्य : जो मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित असून आपल्या कृष्णभावनाभावित कर्मामध्ये संतुष्ट आहे. त्याला इत:पर काही कर्तव्य करावयाचे राहात नाही. तो कृष्णभावनाभावित असल्यामुळे, हजारो हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता, त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्‍वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत्कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहात नाही. असा कृष्णभावनाभावित मनुष्य भौतिक कर्मांत कधीच रममाण होत नाही आणि मदिरा, मदिराक्षी आणि इतर प्रलोभनांमध्येही तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही.

« Previous Next »