No edit permissions for मराठी

TEXT 4

na karmaṇām anārambhān
naiṣkarmyaṁ puruṣo ’śnute
na ca sannyasanād eva
siddhiṁ samadhigacchati

-नाही; कर्मणाम्- विहित कर्मांचे; अनारम्भात्- न करण्याने; नैष्कर्म्यम् - कर्मबंधनातून मुक्ती; पुरुष:-मनुष्य; अश्‍नुते - प्राप्ती करतो; -नाही; - सुद्धा; सन्न्यसनात् - त्यागाने; एव-केवळ; सिद्धिम्-सिद्धी किंवा यश; समधिगच्छति- प्राप्त करतो.

केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही तसेच केवळ संन्यासनेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही.

तात्पर्य: भौतिकवादी मनुष्याने हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणे होतो; परंतु श्रीकृष्ण या तत्त्वाला मान्यता देत नाहीत. हृदयशुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो. याउलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंतांच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. (बुद्धियोग) स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् या तत्त्वाच्या अल्पशा पालनानेही एखादा महान संकटातून पार होऊ शकतो.

« Previous Next »