No edit permissions for मराठी

TEXT 17

karmaṇo hy api boddhavyaṁ
boddhavyaṁ ca vikarmaṇaḥ
akarmaṇaś ca boddhavyaṁ
gahanā karmaṇo gatiḥ

कर्मण:- कर्माचे; हि-निश्‍चितच; अपि-सुद्धा; बोद्धव्यम्- जाणून घेतले पाहिजे; बोद्धव्यम्-जाणून घेतले पाहिजे; -सुद्धा; विकर्मण-निषिद्ध कर्म किंवा विकर्म;  अकर्मण:- अकर्माचे; -सुद्धा; बोद्धव्यम्- जाणून घेतले पाहिजे; गहना- गहन किंवा अत्यंत कठीण; कर्मण:- कर्माचे; गति:- गती, प्रवेश

कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे.

तात्पर्य: भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यांतील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वत: पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्णभावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वत: व भगवंत यांतील संबंधाविषयीचे ज्ञान पाप्त करणे आवश्यक आहे. ज्याला या संबंधचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की, प्रत्येक जीव हा भगवंतांचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्णभावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्णभावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत व त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्णभावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे, नाही तर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील.

« Previous Next »