No edit permissions for मराठी

TEXT 22

yadṛcchā-lābha-santuṣṭo
dvandvātīto vimatsaraḥ
samaḥ siddhāv asiddhau ca
kṛtvāpi na nibadhyate

 
यदृच्छा-सहजपणे; लाभ-लाभाने; सन्तुष्ट:- संतुष्ट राहणारा; द्वन्द्व-द्वंद्व; अतीत:- अतीत झालेला; विमत्सर:- मत्सरातून मुक्त; सम:- स्थिर; सिद्धौ-यशामध्ये; असिद्धौ-अपयशामध्ये; -सुद्धा; कृत्वा-करून; अपि-जरी; -कधीच नाही; निबध्यते-बद्ध होत नाही.

जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, तो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालनपोषण करण्यासाठीसुद्धा विशेष प्रयास करीत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही, तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्णभावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तरीही भगवत्सेवेप्रीत्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वांपासून विचलित न होता, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दु:ख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो. कृष्णभावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्मे करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात.

« Previous Next »